जळगाव प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील आमडदे येथील 38 वर्षीय तरूणाने शेतात विष घेतले. त्याला उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत भडगाव पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजय धनराज सोनवणे वय 38 रा. आमडदे ता. भडगाव यांनी आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास शेतात पिक फवारणीचे विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब नातेवाईकांना खासगी वाहनाने जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दुपारी दीड वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत भडगाव पोलीसात घटनेची मृत्यूची नोंद करण्यात आली.