जळगाव प्रतिनिधी । शहरातील दांडेकर नगरात राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाने आजाराच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवार १४ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. रामानंद पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राजेश रतन मोतीरिया (वय २४) रा. दांडेकर नगर असे मयत तरूणाचे नाव असून तो आईसह राहत होता. राजेशच्या वडिलांचे गेल्या महिन्यात निधन झाले होते. उच्चशिक्षित असलेला राजेश हा शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात होता. दरम्यान आज मंगळवार १४ रोजी राजेशची आई स्वामी समर्थ केंद्रात प्रवचन ऐकण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी जयेश हा एकटाच होता. घरात कोणी नसतांना राजेशने घरात गळफास घेत आत्महत्या केली. आई स्वामी समर्थ केंद्रातून परत आली असता त्यांच्या लक्षात आल्यानंतर हंबरडा फोडला. शेजारी राहणाऱ्यांनी पोलिसांना कळविण्यात आल्याने पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठत मृतदेह खाली उतरविला. अत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी रामानंद पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या वर्षीही राजेश याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.