जळगाव प्रतिनिधी । वाघुर नदीत बुडणाऱ्या शेतकरी व त्याच्या बैलांना दोघं तरुणांनी क्षणाचाही विलंभ न करता वाचविल्याची घटना आज पहूर पेठ, ता. जामनेर येथे घडली. या घटनेत एका बैलाचा बुडून मृत्यू झाला तर शेतकरी व त्याचा दुसरा बैल वाचविण्यात तरुणांना यश मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहूर पेठ येथील रहिवासी शेतकरी रवींद्र तुळशीराम पाटील हे आज २ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास बैलगाडीने शेताकडे जात असतांना बैलांना पाणी पाजण्यासाठी त्यांनी बैलगाडे नदी पात्राकडे वळविने. दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने रवींद्र पाटील हे बैलगाडीसह नदीपात्रात बुडाले. घटना लक्षात येताच नागरिकांनी तात्काळ धाव घेतली. याच दरम्यान, नदी जवळ गर्दी कसली हे बघण्यासाठी पलेश जानराव देशमुख(वय २९, धंद: नोकरी) व सागर जोमाळकर(वय २३, धंदा: शेती) हे गेले असता त्यांच्या लक्षात घटना येतात त्यांनी क्षणाचाही विलंभ न करता नदीत उडी घेत बचाव कार्य केले. यात शेतकरी रवींद्र पाटील व त्यांच्या एक बैलला वाचविण्यात दोघ तरुणांना यश आले. मात्र एका बैलाचा बुडून मृत्यु झाला. दरम्यान, बचाव कार्य करत असतांना पलेश व सागर यांच्या नाका तोंडात पाणी जात त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सुरुवातीला त्यांच्यावर पहूर ग्रामीण रुग्णालयत प्रथोमोपचार करण्यात येवून पुढील उपचरासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून येथे त्यांच्यावर उपचर सुरु आहे. सागर व पलेश यांनी दाखविलेल्या धाडसाचे परिसरात कौतूक होत आहे.