भुसावळ प्रतिनिधी । ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये रेड कलर डे व रैनी डे आज शनिवारी दि. 20 जुलै रोजी साजरा करण्यात आला.
यावेळी ताप्ती पब्लिक स्कुलच्या १ लीच्या विद्यार्थ्यानी रेड कलर डे साजरा केला. ज्यात विद्यार्थ्यांनी जीवनात लाल रंगाचे महत्व सांगितले व लाल रंगाच्या वस्तूंची ऐपल, हार्ट, स्त्राबेरी, वाटरमेलन व इतर वस्तूंच्या आकाराचे चित्र परिधान करून त्या-त्या वस्तूंचे महत्व पटवून दिले. तसेच नर्सरी, ज्यू केजी, सी.के.जीच्या विद्यार्थ्यांनी रैनी डे साजरा केला. यामध्ये विद्यार्थ्यांनी छत्री, रेनकोट परिधान करून पावसाचा आनंद लुटला. याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी पाण्यामध्ये कागदी नाव बनवून सोडल्या आहेत. कार्यक्रम चालू असतांना वरुण देवाने देखील उपस्थिती दर्शविली असून कार्यक्रमात उपस्थित पालक-वर्गांनी सुद्धा आनंद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका नीना कटलर व सर्व शिक्षक व शिक्षेकतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.