तांबापूरा दंगलीतील बारा आरोपींना पोलीस कोठडी

court

जळगाव प्रतिनिधी । शहरातील तांबापुरा भागात झालेल्या दंगल प्रकरणी पोलिसांनी अटकसत्र सुरू केले असून दोन्ही गटांवर परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील 12 जणांना अटक करण्यात आली आहे. दंगलीतील 12 जणांना आज जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 मे 2019 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

तांबापुरा भागात काल रात्री दोन गटांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री होऊन अनेक जण घायाळ झाले आहेत. रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी हा वाद मिटवल्याने आता परिसरात शांतता आहे. दरम्यान, या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस स्थानकामध्ये दोन्ही गटांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी मोनुसिंग जगदीशसिंग बावरी याने दिलेल्या फिर्यादीवरून राहूल शिवाजी हटकर (वय२९); आकाश अशोक हटकर (वय २२); विजय राजू हटकर; गोलू छोटू हटकर; भावडू उर्फ भाऊसाहेब शांताराम सुरंगे; बारकू मन्साराम हटकर; रवींद्र अर्जुन गर्दे; आकाश बबन हटकर; अमोल कैलास पिसे; बंडू शंकर हटकर यांना अटक करण्यात आली आहे. तर रवी राजू हटकर; बबलू बापू हटकर; सागर बापू हटकर; राकेश धनराज हटकर; भुर्‍या धोबी, दीपक समाधान हटकर; राजू हटकर; गोपाळ अंकुश हटकर; संजय अशोक हटकर; प्रकाश पारधी; विशाल हटकर; कैलास नथ्थू भोई व जिभाऊ उत्तम हटकर यांना अटक करण्यात आली आहे. तर रवी राजू हटकर, बबलू बापु हटकर, सागर बापु हटकर, राकेश धनरा हटकर, भुच्या धोबी, दिपक समाधान हटकर, राजु हटकर, गोपाल अंकुश हटकर, संजय अशोक हटकर, प्रकाश पारधी, विशाल हटकर, कैलास नथ्थू गर्दे, जिभाऊ उत्तम हटकर हे फरार आहेत.

तर दुसऱ्या गटातील रविंद्र राजू हटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोनुसिंग जगदिशसिंग बावरी, मोहनसिंग जगदीशसिंग बावरी, भोलासिंग जगदीशसिंग बावरी, जगदीशसिंग हरीसिंग बावरी, दर्शनसिंग अमसिंग बावरी, सुरेद्रसिंग सेवासिंग भाटीया, बलविरसिंग तेजसिंग टाक यांच्यासह तीन ते चार जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी जगदीशसिंग हरीसिंग बावरी, बलविरसिंग तेजसिंग टाक या दोघांना अटक करण्यात आली आहे.

यातील राहूल शिवाजी हटकर; आकाश अशोक हटकर ; विजय राजू हटकर; गोलू छोटू हटकर; भावडू उर्फ भाऊसाहेब शांताराम सुरंगे; बारकू मन्साराम हटकर; रवींद्र अर्जुन गर्दे; आकाश बबन हटकर; अमोल कैलास पिसे; बंडू शंकर हटकर यांना अटक करण्यात आली आहे. तर रवी राजू हटकर; बबलू बापू हटकर; सागर बापू हटकर; राकेश धनराज हटकर; भुर्‍या धोबी, दीपक समाधान हटकर; राजू हटकर; गोपाळ अंकुश हटकर; संजय अशोक हटकर; प्रकाश पारधी; विशाल हटकर; कैलास नथ्थू भोई व जिभाऊ उत्तम हटकर आणि जगदीशसिंग हरीसिंग बावरी, बलविरसिंग तेजसिंग टाक यांना अटक केल्यानंतर आज जिल्हा न्यायालयाचे न्या. श्रीमती एम.एम. चौधरी यांच्या न्यायालयात हजर केले असता 2 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली तांबापुरा भागात सर्च ऑपरेशन राबवून आरोपी यांना अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सफौ अतुल वंजारी, प्रकाश निंबाळकर, रामकृष्ण पाटील, निलेश पाटील, मनोज सुरवाडे, दीपक चौधरी, किशोर पाटील, विजय पाटील, हेमंत कडसकर, राजू राणे, तुकाराम निंबाळकर यांनी केली आहे. सदरची कारवाई एआरटी पथक व क्यूआरटी पथकाच्या साह्याने केली आहे.

Add Comment

Protected Content