Home क्राईम बेकायदा तलवार बाळगणाऱ्या तरूणावर गुन्हा

बेकायदा तलवार बाळगणाऱ्या तरूणावर गुन्हा

0
100
crime-2

crime 4 3

धरणगाव प्रतिनिधी । हातात तलवार घेवून दहशत निर्माण करणाऱ्या तरूणाला अटक करत तलवार हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील सकारा गावातील जुगनू भाऊराव पाटील (वय-28) रा. सकारा ता.धरणगाव हा लोखंडी पात्याची 32 इंच लांब व 4 इंच लांब पिवळ्या धातूची मूठ असलेली नक्षीदार कव्हर असलेली तलवार घेवून परीसरात दहशत निर्माण करीत असल्याची गुप्त माहिती धरणगाव पोलीसांना मिळाली. त्यानुसार आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास धरणगाव पोलीसांनी तलवारीसह अटक केली. पो.ना. वैभव बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून आर्म ॲक्ट नुसार जुगनू पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास धरणगाव पोलीस कर्मचारी करीत आहे.


Protected Content

Play sound