Home क्रीडा तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत शारदा इंग्लिश मीडियम संघाला यश

तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत शारदा इंग्लिश मीडियम संघाला यश

0
53

sharada school

 

पाचोरा प्रतिनिधी । येथे एम.एम महाविद्यालयामध्ये शालेय तालुकास्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन दि. 8 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग नोंदविला होता. परंतू शारदा इंग्लिश मीडियम संघाला घवघवीत यश मिळाले असून त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

या तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत शारदा इंग्लिश मीडियमच्या मोहित पांडे, किरण सोनवणे, परीक्षित पाटील, भूषण परदेशी, रोहन चौथे, साहिल शेख हे विद्यार्थी विजयी झाले असून त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. शाळेचे अध्यक्ष प्रदीप पांडे, सचिव निलेश पांडे, प्राचार्य डी.ए.पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिला आहेत. शाळेचे कराटे प्रशिक्षक प्रकाश निकम यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेचे उद्घाटन माजी क्रीडा समन्वयक ए.जे. महाजन यांनी केले होते.


Protected Content

Play sound