जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील देऊळवाडा या गावातून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांनी शुक्रवार, २८ जुलै रोजी सकाळी दहा वाजता कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी वाळूसह ट्रॅक्टर जप्त केले आहे, याप्रकरणी ट्रॅक्टरवरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील देऊळवाडा गावातून ट्रॅक्टरच्या माध्यमातून अवैधपणे वाळूची चोरटी वाहतूक केली जात असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार परिक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिसांनी शुक्रवारी सकाळी दहा वाजता सापळा रचून वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली, ट्रॉलीसह ट्रॅक्टर तसेच अर्धाब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण कोळी यांच्या फिर्यादीवरुन ट्रॅक्टरवरील चालक ताराचंद रामचंद्र सोनवणे वय ४२ यांच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुधाकर शिंदे हे करीत आहेत.