धोनीचा आयपीएलमधून निवृत्ती घेण्याच्या चर्चांना पूर्ण विराम

अबु धाबी । धोनीला समालोचक डॅनी मॉरिस यांनी ‘पिवळ्या जर्सीत आजचा हा तुझा अखेचा सामना आहे का?’ असे विचारले. त्यावर धोनीने ‘नक्कीच नाही’ असे उत्तर देत आयपीएलमधून निवृत्ती घेण्याच्या चर्चांना पूर्ण विराम दिला. 

आयपीएल २०२० मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आपला अखेरचा सामना खेळत आहे. याच बरोबर संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेही आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याने तो आता आयपीएलमधूनही निवृत्ती घेईल अशी चर्चा होती.  धोनीला समालोचक डॅनी मॉरिस यांनी ‘पिवळ्या जर्सीत आजचा हा तुझा अखेचा सामना आहे का?’ असे विचारले. त्यावर धोनीने ‘नक्कीच नाही’ असे उत्तर देत आयपीएलमधून निवृत्ती घेण्याच्या चर्चांना पूर्ण विराम दिला. 

चेन्नईची यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी झाली नाही. त्यांनी आतापर्यंत स्पर्धेत १३ सामने खेळले आहेत. त्यातील ८ सामने गमावले आहेत. त्यांना फक्त ५ सामन्यात विजय मिळवता आल्याने ते १० गुणांसह गुणतालिकेत तळात आहेत.

 

Protected Content