चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगावव्दारा आज 31 मे रोजी जागतिक तंबाखूविरोधी दिन साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी तंबाखूमुळे होणाऱ्या गंभीर आजारांबद्दल उपस्थित नागरिकांना माहिती दिली.
शासनासह जिल्हा परिषद आरोग्य विभाग जळगावतर्फे सर्व आरोग्य केंद्र व सरकारी दवाखान्यात 31 मे ते 30 जून या कालावधीत नागरिकांना मौखिक आरोग्य तपासणी करून कॅन्सरसारख्या घातक रोगांपासून लांब राहण्यासाठी तंबाखू व गुटखा आदी व्यसनांची आहुती करण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ प्रमोद सोनवणे यांनी केले आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बी एस कमलापुरकर , जिल्हा परिषद सदस्य अतुलदादा देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ देवराम लांडे, पंचायत समिती सदस्य अजय भाऊसाहेब पाटील, सौ प्रिती विष्णू चकोर यांचे मार्गदर्शनाखाली सदर तंबाखूविरोधी व मौखिक आरोग्य तपासणी मोहीम 22 गावांमध्ये महिनाभरात राबविण्यात येणार आहे. आरोग्य केंद्रात आज तंबाखू विरोधी कायदा नागरिकांना जनजागृती करून मौखिक आरोग्याची शपथ आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आदींना वैद्यकीय अधिकारी डॉ प्रमोद सोनवणे यांनी दिली.
दरम्यान, युवा पिढी बरबाद तर देश बरबाद होत असतो. आज 54 टक्के युवा पिढी ही तंबाखू – गुटखाचे व्यसनाधीन झाल्याने मोठा धोका निर्माण झाल्याची खंत डाॅ प्रमोद सोनवणे यांनी व्यक्त केली. या मोहिमेत मौखिक आरोग्य तपासणी करून नागरिकांना कॅन्सरसारखा आजार होऊ नये म्हणून शाळा, हायस्कूल, काॅलेज, गावपातळीवर जनजागृती करण्यात येणार आहे. तंबाखू हेच मौखिक कर्करोगाचे प्रमुख कारण असल्याने मौखिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी तंबाखू खाऊच नये, मौखिक कर्करोग जर पहिल्या अवस्थेत निदान झाला तर तो आटोक्यात आणता येतो म्हणूनच नागरिकांनी तात्काळ तपासणी करून घ्यावी.
मौखिक कर्करोगाची प्राथमिक लक्षणे
– तोंड उघडण्यास ञास होणे
– तोंडात जास्त दिवस जखम असणे
– दात दुखणे
– तोंडात पांढरे चट्टे पडणे
– वारंवार तोंडाला छाले पडणे.
आदी लक्षणे जास्त दिवस राहिल्यास कॅन्सर होण्याची शक्यता असते. तरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन तळेगाव आरोग्य केंद्राने केले आहे. याप्रसंगी आरोग्य सहाय्यक एल सी जाधव, विठ्ठल चव्हाण , सौ सुनंदा महाजन, राजू पाटील, एल डी पवार, विजय देशमुख, मोहन राठोड, विष्णू राठोड, अशोक परदेशी, सरला चव्हाण, शितल सोळुंके, सविता पेंभरे, सविता परदेशी, योगिता शिंदे, विजय सोनवणे, गटप्रवर्तक ज्योत्स्ना शेलार , राकेश पाटील, चेतन मोरे, सुनिल मोरे , उदयसिंग पाटील आदी उपस्थित होते.