पत्रकाराला मारहाण करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करा

सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील एका पत्रकाराला दुर्गा विसर्जन मिरवणुकीत धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली आहे. यासंदर्भात सावदा पोलिसांकडे तक्रार करून देखील दोषींवर कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. तरी दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार रावेर तालुका संघाच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, सावदा येथील जितेंद्र कुळकर्णी या पत्रकाराला दुर्गा विसर्जन मिरवणुकीत धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली आहे. त्यांनी तशी सावदा पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आहे. तरी सदर दोषीवर कठोर कारवाई अद्याप झालेली नाही. पत्रकारांना धक्काबुक्की, मारहाण हे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत, म्हणून आरोपींना अद्दल घडली पाहिजे, कारण आज एका पत्रकारांवर आहे. उद्या अजून दुसऱ्या कोणत्याही पत्रकार ही परिस्थिती नक्कीच ओढवून शकते, म्हणून अशा घमंडी खर वृत्तीच्या विषारी फणा ठेचण्यासाठी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जबाबदारीने लक्षणिय अत्यंत आवश्यक निष्पक्षपाती कार्यवाही करण्यात यावी यापुढे कुणीही दुसऱ्या कोणत्याही पत्रकाराला धक्काबुक्की, मारहाण, धमकी, दमबाजी करण्याचा प्रयत्न करणार नाही. म्हणून सदर दोषींवर कठोर कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी.  निवेदनावर सातपुडा जर्नलिस्टअसोसिएशनचे अध्यक्ष तथा साप्ताहिक लेवाजगत वृत्तपत्राचे संपादक शाम पाटील,सदस्य पत्रकार प्रविण पाटील,रवींद्र हिवरकर,आत्माराम तायडे, राजू दिपके, साजिद उर्फ मडा, युसुफ शाह,दिलीप चांदलकर, फरीद शेख व कोचुर येथील पत्रकार कमलाकर पाटील, पंकज पाटील, राजेंद्र भारंबे, संजय चौधरी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर तालुका अध्यक्ष विलास ताठे, उपाध्यक्ष संतोष नवले, कार्याध्यक्ष योगेश सैतवाल, सदस्य, दिपक श्रावगे, महेंद्र पाटील, आदी उपस्थित होते यावेळी गुन्हेगाराविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी व अन्यायग्रस्त पत्रकारास न्याय मिळावा याकरिता सावदा पो.स्टे. चे स.पो.नी. देविदास इंगोले व पो.उ. नी. समाधान गायकवाड यांना निवेदन देण्यात आले

Protected Content