अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मनोहर भिडे याचे मानसिक संतुलन बिघडल्याप्रमाणे वागत असून महापुरुषांबाबत अपमान कारक वक्तव्य करीत आहे. मनोहर भिडे याच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा येरवडा येथील मनोरुग्णांच्या तुरुंगात त्यास डांबून टाकावे, अशी मागणी करत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यासंदर्भात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, महाराष्ट्र माळी समाज महासंघ व माळी समाज पंचमंडळ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळच्या वतीने अमळनेर येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
मनोहर भिडे याच्यावर लवकरात लवकर कारवाई केली नाही तर राज्यभर समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मंत्री ना. छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील यावेळी समता परिषदेतर्फे व माळी समाजातर्फे यांनी दिला आहे. मनोहर भिडे याने मागील काही दिवसापूर्वी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बाबत अवामानकारक वक्तव्य केले होते.
सदरील निवेदन देताना समता परिषदेच जळगाव जिल्हा उपाध्यक्ष भीमराव महाजन, शहरअध्यक्ष प्रताप पाटील माळी समाजाचे अध्यक्ष मनोहर महाजन सर, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे तालुकाध्यक्ष महेंद्र महाजन,माजी नगरसेवक देविदास महाजन , गंगाराम निंबा महाजन , दिनेश माळी,मा उपनगराध्यक्ष पांडुरंग नामदेव महाजन, गणेश पांडुरंग महाजन, गुलाब ओंकार महाजन, अँड. सुदाम श्रावण महाजन, अँड. कुंदन साळुंखे, प्रा. अशोक पवार सर, माजी उपनगराध्यक्ष आबू महाजन, सेवा मंडळाचे अध्यक्ष गणेश शंकर महाजन, अँड रमाकांत माळी, अशोक महादू महाजन, बी आर महाजन सर, रमेश सुदाम महाजन, अशोक पोपट महाजन, संजय हिम्मत महाजन, संदीप महाजन सर, ईश्वर चौधरी,साखरलाल महाजन सर, संदिप महाजन सर,योगेश महाजन सर, प्रा. प्रकाश महाजन, सुनील महाजन, योगेश महाजन, श्याम पाटील, विठ्ठल पाटील, जाकीर मेवाती, अनिल महाजन सर ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या रंजना महाजन, चित्रकला महाजन, ज्योती महाजन, प्रतिभा महाजन, रत्ना महाजन, प्रमिलाताई महाजन ,लताबाई महाजन, मनीषा महाजन, अर्चना महाजन, स्मिता महाजन, यांच्यासह समता परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, फुले प्रेमी नागरिक आदींची उपस्थिती होती.
प्रतिकात्मक पुतळा दहन करून केला निषेध
निवेदन देण्यापूर्वी क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या कार्यप्रेरणा स्तभाजवळ वाचाळवीर मनोहर भिडे याच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चपला बुटांचा चोप देऊन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने दहन करण्यात आला. यावेळी मनोहर भिडे याच्या निषेधार्थ घोषणा देऊन मनोहर भिडे याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.