Home न्याय-निवाडा न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी देशाचे सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ

न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी देशाचे सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ

0
25

नवी दिल्ली-लईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली असून ते आगामी दोन वर्षे सरन्यायाधीश म्हणून न्यायदानाचे काम करणार आहेत.

निवृत्त होणारे सरन्यायाधीश नव्या सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस करतात. त्यानुसार सरन्यायाधीश उदय लळीत यांनी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केंद्राकडे केली होती. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. आज राष्ट्रपतीभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. यामुळे लागोपाठ दुसर्‍यांदा सरन्यायाधिशपदाची धुरा मराठीच्या सुपुत्राकडे आली आहे.

न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती वाय व्ही चंद्रचूड हे देशाचे १६ वे सरन्यायाधीश होते. न्यायमूर्ती वायव्ही चंद्रचूड यांचा कार्यकाळ २२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५ म्हणजेच सुमारे ७ वर्षांचा होता. त्यांच्या निवृत्तीनंतर ३७ वर्षांनी त्यांचे पुत्र न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची त्याच पदावर नियुक्ती झाली आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी सुप्रीम कोर्टातील त्यांच्या वडिलांचे दोन मोठे निर्णयही रद्द केले आहेत.


Protected Content

Play sound