गावठी हातभट्टीची दारू विक्रीवर कारवाई करा; वड्री ग्रामस्थांचे निवेदन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेल्या वड्री गावात गेल्या अनेक दिवसांपासून गावठी हातभट्टीची दारू विक्री होत असल्याने तरूण पिढी व्यसनाधिन होत आहे. ही गावठी हातभट्टीची दारू विक्रीवर कारवाई करा अशी मागणीचे निवेदन सरंपचांसह ग्रामस्थांच्या वतीने यावल पोलीसांना निवेदन देण्यात आले.

 

यावल तालुक्यातील वड्री गावात खुलेआम सार्वजनिक ठीकाणी अत्यंत विषारी पदार्थानी बनविण्यात येत असलेली हातभट्टीची गावटी दारू विकली जात असुन , या दारूमुळे तरूणांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असुन , दारूच्या आहारी गेलेल्या तरूणांकडून गावात भानगडी व वाद उत्पन्न होत असल्याने यामुळे  गावाची कायद्या सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही . तरी पोलीस प्रशासनाने तात्काळ हातभट्टीतुन तय्यार केलेली विषारी गावटी दारूच्या विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करून गावातील होणारी दारूची तात्काळ थांबवावी अशी मागणी केली आहे. या निवेदनावर वड्री गावाचे प्रथम नागरीक सरपंच अजय भागवत भालेराव ,बशीर परवान तडवी, असलम हसन तडवी, हमीद निजाम तडवी , फकीरा अरमान तडवी यांच्या स्वाक्षरी आहे .

Protected Content