अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यावर कारवाई करा; यावल तहसीलदारांना निवेदन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  नांदेड तालुक्यातील मुंदखेड तालुक्यातील एका समाजाच्या अल्पवयीन मुलीवर छेडखानी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करून पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणी समाजाच्या वतीने यावल तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

 

राज्यातील मराठवाडा क्षेत्रातील निवघा तालुका मुंदखेड जिल्हा नांदेड येथे कासार समाजाची अल्पवयीन मुलगी हिच्यावर गावगुंड ज्ञानेश्वर पवार उर्फ सोन्या यांने वर्षभर अनेक वेळा छेडछाड केल्याने १२ जुलै २०२३ रोजी तिचा बळी गेला मुलगी अल्पवयीन असल्यामुळे आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करावा व आरोपींवर कठोर कार्यवाही करावी. आरोपींविरुद्ध बाललैंगिक अत्याचार उसको अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात कासार समाज आंदोलन चढतील व होणाऱ्या परिणामास महाराष्ट्रातील कासार समाज जबाबदार राहणार नाही असेही या निवेदनात नमूद केलेले आहे.

 

याप्रसंगी यांची होती उपस्थिती

विजय कासार सचिन कासार अशोक कासार, गोविंदा कासार, मिलिंद कासार, चंद्रकांत कासार, अभंग कासार ,सुभाष कासार, मुरलीधर कासार, विनोद कासार ,सचिन कासार , यश कासार, प्रेम कासार ,धंनजय कासार , अमोल कासार , प्रशांत कासार , संतोष कासार, वैभव कासारसह समाज बांधवांच्या  स्वाक्षरी आहेत.

Protected Content