आमली पदार्थ सेवन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील खडका रोडवरील ईदगाहच्या बाजूला गांजाचा नशा करणाऱ्या तीन जणांविरोधा भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता कारवाई केली आहे. याप्रकरणी गुरूवारी २२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील खडका रोडवरील ईदगाहच्या बाजूच्या परिसरात काही जण बेकायदेशीररित्या चिलीममधून गांजाचा नशा करत असल्याची गोपनिय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणदिवे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईबाबत सुचना दिल्या. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पथकाने बुधवार २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता कारवाई करत संशयित आरोपी सलमान शेख सलिम शेख वय २०, युनुस हमीद शेख वय ४८ आणि करीम नुर मोहम्मद शेख वय-५६ तिघे रा. मुस्लिम कॉलनी, भुसावळ गांजाचा नशा करतांना रंगेहात पकडले. याप्रकरणी गुरूवार २२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ नेव्हिल बार्टले, पोहेकॉ गणेश चौधरी आणि पोहेकॉ भूषण जैतकर हे करीत आहे.

Protected Content