जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | ज्ञानवापी प्रकरणी भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी बदनामीकारक वक्तव्य केले असून त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी अशा आशयाची मागणीचे निवेदन मुस्लिम बांधवांतर्फे पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.
भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी २८ मे रोजी एका इंग्रजी वृत्तवाहिनीवर ज्ञानवापी प्रकरणी मुस्लीम धर्मातील प्रेरणास्रोतांचा अपमानास्पद उल्लेख करीत मुस्लीम धर्मीयांच्या भावना दुखावतील असे वक्तव्य केले आहे. भाजपच्या शर्मा यांच्या वक्तव्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या विरुध्द कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार निवेदनाद्वारे जळगाव शहरातील सुन्नी मुस्लीम समाजातर्फे शनि पेठ पोलीस ठाणे निरीक्षक तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आली.
यावेळी सुन्नी ईदगाह ट्रस्ट आणि सुन्नी जामा मस्जिदचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली, इक्बाल वझीर, रशीद कुरेशी, अहेमद खान, सय्यद जावेद, फारुख तंवर, अफझल मनियार, नुर मुहंमद, नाझीम पेंटर, शेख शफी, मौलाना अशपाक रजा, मोहसीन मनियार, रफिक पटेल, शेख सदाकत, शेख नूर मोहम्मद आदि उपस्थित होते.