जळगाव प्रतिनिधी । मनसेचे माजी पदाधिकारी शाम दीक्षित खून प्रकरणातील अटकेत असलेल्या दोघा आरोपींना आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता दोन्ही संशयित आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
असा आहे घटनाक्रम
रविवारी सकाळी शहरातील देविदास कॉलनीतील साईबाबा मंदिराजवळ शाम दीक्षित या तरुणाचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर पोलिसांनी गतीने तपासचक्र फिरवायला सुरुवात केली आणि रविवारी दुपारपर्यंत गुन्हाचा गुन्हा उघडकीस आणला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शनिवारी रात्री उशीरापर्यंत हॉटेल रिगल पॅलेस, भजे गल्ली, जळगाव येथे मयत घनशाम शांताराम दिक्षीत व सुधीर महाले हे दोघं जण बसलेले होते. त्याचवेळी बाजूच्या टेबलावर मोहनीराज उर्फ मुन्ना अशोक कोळी (रा- सब जेलमागे,जळगाव) हा त्याच्या दोन मित्रांसोबत दारु पीत होता. तू माझ्या टेबलावर ये, यावरून यावेळी घनशामसोबत त्यांचा वाद झाला. यावेळी मुन्नासोबत सनी उर्फ चाळीस वसंत पाटील (रा- रामेश्वर कॉलनी, जळगाव) हा देखील होता. त्यामुळे हा खून दोघांनी केला असल्याचा पोलिसांना सुरुवाती पासून संशय होता.
दुचाकीने पहुरकडे फरार
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचनेनंतर आरोपींच्या पथकं रवाना करण्यात आली होती. तत्पूर्वी या संदर्भात बाबतीत मयत घनशाम याचा भाऊ गणेश शांताराम दिक्षीत यांचे फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोस्टेचे पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांना सदर आरोपी हे बजाज डिस्कव्हर वाहनाने पहुर पाळधीकडे गेले असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पो.नि. रणजीत शिरसाठ व त्यांचेसोबत सहा.फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, विजय पाटील, मनोज सुरवाडे, हेमंत कळसकर, किशोर पाटील, निलेश पाटील, प्रविण मांडोळे, गोविंदा पाटील, सचिन पाटील अशांचे पथक रवाना झाले होते. या दरम्यान जळगाव-औरंगाबाद रोडवर भवानी फाटा, पहुर पाळधी या गावाजवळ पोलीस पथकाला बजाज डिस्कव्हर मोटर सायकल रोडवर लावलेली दिसली. तसेच दोन इसम शेतामध्ये लांब उभे असल्याचे दिसून आले. पोलिसांनी दोघां आरोपींना लागलीच ओळखले.
सहा तासात गुन्हा उघडकीस
सदरचा गुन्हा हा घडल्यानंतर आरोपीतांनी गुन्हा केल्याचा कुठल्याही प्रकारे सुगाय ठेवला नसतांना देखील कौशल्यपूर्णपणे काम करुन सहा तासाच्या सदरचा गुन्हा एमआयडीसी पोलीसांनी उपडकीस आणल्यामुळे पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले यांनी एमआयडीसी पोलीसांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, रविवारी दुपारी अटक केल्यापासून शाम दीक्षित सोबत १० हजार रुपयावरून वाद असल्याचे मुन्ना आणि सनी सांगतोय. परंतू १० हजार सारखी किरकोळ रकमेसाठी खून होईल असे पोलिसांना वाटत नाहीय. आरोपी खुनाचे खरे कारण लपवित असल्याचा त्यांना संशय आहे. मात्र, संशयितांची पार्श्वभूमी आणि घटनाक्रम बघता पोलिसांना अजूनही वेगळा संशय असून त्या दिशेने पोलिसांची चौकशी करत असल्याचे कळते. आज दोन्ही संशयित आरोपींनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता दोघांना २९ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.