Home क्राईम आसोदा येथील तरूणावर तलवार हल्ला; तीन जणांवर गुन्हा

आसोदा येथील तरूणावर तलवार हल्ला; तीन जणांवर गुन्हा


जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आसोदा येथील तरूणाने पोलीसात तक्रार दिल्याच्या रागातून तीन जणांनी तलवार हल्ला करून गंभीर जखमी केल्या घटना घडली. तालुका पोलीसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय एकनाथ घुले (वय-३८) रा. ढंढोरे नगर, तरसोद रोड आसोदा ता.जि.जळगाव असे जमखी झालेल्या तरूणाचे नाव आहे. विजय घुले यांनी गावातील जितेंद्र बाबुराव देशमुख याच्या विरूध्द जुन्या वादातून जिल्हापेठ पालीसात तक्रार दिली होती. याचा राग मनात ठेवून जितेंद्र देशमुख सह योगेश डिगंबर कोल्हे आणि भरत बाळू पाटील सर्व रा. आसोदा ता.जि.जळगाव यांनी शुकवार १४ मे रोजी दुपारी १ ते १.१५ वाजेच्या सुमारास विजय घुले यांच्यावर तलवार हल्ला करून जखमी केले. तर लोखंडी रॉड आणि दांडक्याने बेदम मारहाण केली. शनिवारी सायंकाळी विजय घुले यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीसात तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउनि कल्याण कासार करीत आहे. 


Protected Content

Play sound