यावल ( प्रतिनिधी) तालुक्यातील बोरावल गावात एकाच कुटुंबातील चार जणांना स्वाईन फ्लू ची लागण झाल्याचे वृत प्राप्त झाले असून, यातील एका रुग्णाला मुंबई येथे तात्काळ पाठविण्यात आले आहे. स्वाईन फ्लूचे रूग्ण गावात आढळल्याने नागरीकांमध्ये सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे.
या संदर्भात आरोग्य सुत्राकडून मिळालेली माहीती अशी की, यावल तालुक्यातील बोरावल या ६०० लोकवस्ती च्या गावातील दिपाली अमोल पाटील (वय २६ वर्ष) या मागील तिन दिवसांपासुन हिवतापाने आजारी आल्याची माहीती आरोग्य पथकाला मिळाली होती. माहिती मिळताच पथकाने तात्काळ गावातील प्रत्येक कुटुंबांची आरोग्य तपासणीची मोहीम राबवली. या आरोग्य तपासणीत अमोल दिनेश सिंग पाटील (वय३६ वर्ष) , भूमी अमोल पाटील (वय५ वर्ष) व अमोल पाटील यांच्या आई रंजना दिनेश सिंग पाटील (वय५५ वर्ष) आणि दवाखान्यात उपचार घेत असलेल्या दिपाली अमोल पाटील (वय२६ वर्ष)या एकाच कुटुंबातील सर्वांना स्वाईन फ्लुची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दिपाली पाटील हिला जळगाव येथील खासगी दवाखान्यात दाखल केले असता तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला तात्काळ मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहीती मिळाली आहे. अरोग्य पथकाने स्वाईन फ्लू गंभीर आजाराचा प्रसार होवु नये या करीता खबरदारीचे उपाय म्हणुन हिवतापाचे व सतत खोकला येणाऱ्या नागरीकानी तोंडाला रुमाल लावुन ठेवावे त्याच बरोबर तात्काळ प्राथमीक आरोग्य केन्द्राशी संपर्क साधावे असे आवाहन केले आहे. गावातील प्रत्येक घराला औषधी वाटण्यात आल्या असल्याची माहीती साकळी येथील प्राथमिक आरोग्य केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर पाटील यांनी दिली. या आरोग्य विषयी दक्षता घेण्यासाठी डॉ. सागर पाटील यांच्या समवेत आरोग्य सहाय्यक पी. पी. ढाके, एस. बी. पारधी, सल्लाउद्दीन शेख व के. पी. तायडे यांचे पथक परिस्थितीवर लक्ष देवून आहे.