यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील पूर्व विभागात वनक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी पदाच्या रिक्त जागेवर वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणुन स्वप्नील मच्छींदर फटांगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावल येथे वनविभागाच्या पुर्व क्षेत्र विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले विक्रम पदमोर यांची शिंदखेडा जिल्हा धुळे येथे बदली झाल्याने मागील चार महिन्यापासुन त्यांच्या रिक्त जागेवर स्वप्नील मच्छिंदर फटांगरे (रा.अहमदनगर) यांची यावलच्या पूर्व विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली असून, सोमवार १६ जानेवारी रोजी अधिकृतरित्या पदभार स्विकारणार आहे.
यावेळी प्रथम आपल्या कार्यालयातंर्गत कामकाजावर आपली शिस्त राहणार असून, आपल्या कार्यक्षेत्रातील होणारी लाकूड माफीयाकडून जंगलातून होणारी मोल्यवान वृक्षांची अवैध वृक्षतोड, शासकीय वनजमिनीवर होणारे परप्रांतीयांचे होणारी बेकायद्याशीर अतिक्रमण या विषयावर आपण गांभींयाने लक्ष केन्द्रीत करणार असल्याचे सांगून अशा प्रकारे कायद्या हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे फटांगरे यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले..