Home Cities जळगाव मुकुंद नगर सेवा केंद्रात स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताहाची सांगता

मुकुंद नगर सेवा केंद्रात स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताहाची सांगता


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | हरीविठ्ठल नगर परिसरातील मुकुंद नगर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात, श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सप्ताह सांगता निमित्त मोफत आरोग्य तपासणी आणि रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले. हे शिबिर जळगाव जिल्हा शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरात वैद्य डॉ. वर्षा गणेश बारी आणि सहाय्यक प्राध्यापक डॉ. पांढरे यांनी उपस्थित राहून महिला व पुरुषांची सखोल आरोग्य तपासणी केली. या उपक्रमासाठी आयुष्य संचालक व अधिष्ठाता डॉ. रामन घुंगराळेकर तसेच प्रभारी अधिष्ठाता डॉ. अभिजीत अहिरे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. तपासणीदरम्यान रुग्णांना मोफत औषधेही वितरित करण्यात आली.

या आरोग्य शिबिराचा परिसरातील सुमारे १०० महिलांनी आणि ५० पुरुषांनी लाभ घेतला. शिबिरादरम्यान सहभागी झालेल्या नागरिकांना आरोग्य जागृतीसंबंधी माहितीही देण्यात आली.

याच सप्ताहाच्या सांगतेप्रसंगी श्री स्वामी समर्थ अखंड नामजप यज्ञ सप्ताह व गुरुचरित्र पारायण सप्ताहाचा समारोप करण्यात आला. सकाळी १०.३० वाजता महानैवेद्य आरतीने सांगता झाली. यानंतर दिंडोरी प्रणीत मार्गातील १८ विभागांबाबत सखोल मार्गदर्शन श्री. अनिल बारी यांनी केले. यासोबतच केंद्रातर्फे पुढील सेवाभावी कार्यक्रमांचे वाचन आणि याआधी झालेल्या सेवेचा आढावाही घेण्यात आला.


Protected Content

Play sound