धरणगाव (प्रतिनिधी) येथील स्वामी समर्थ केंद्रात स्वामींचा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने देशातील दहशदवाद नष्ट व्हावा, पाकीस्तान व चिन या देशांशी लढण्यासाठी आपल्या सैनिकांना बळ मिळावे या उद्देशाने गुरु माऊलींच्या मार्गदर्शनानुसार येथील सेवेकर्यांनी सामुदायिकपणे स्वामीच्या ७०० श्लोकी चरित्र पाठाचे वाचन केले.
येथील स्वामी समर्थ केंद्रात प्रकट दिनाच्या निमित्ताने प्रत्येक अध्यायानंतर श्री काल भैरवाष्टक तसेच प्रत्येक ओवीनंतर श्री स्वामी समर्थ मंत्र जप करण्यात आला. तसेच सर्व सेवेकऱ्यांचे डबे एकत्र करुन स्वामी महाराजांना नैवैद्य दाखवण्यात आला, त्यानंतर आरती झाली. केंद्रप्रमुख राकेश मकवाने यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कार्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अशाप्रकारे अतिशय उत्साहात प्रकट दिन साजरा करण्यात आला.