भालेर ता.नंदुरबार , प्रतिनिधी । येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुरक्षेचा ऊपाय म्हणुन ग्रामपंचायत मार्फत जनजागृती मोहीम व विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे . यानुसार आज ग्रामस्थांचे स्वॅब संकलन व भालेर परिसारत ट्रॅक्टरद्वारे निर्जतुंकीकरण करण्यात आले.
भालेर ग्रामपंचायतीतर्फे ग्रामस्थांनी आरोग्य विषयक काळजी घेणे, गाव निर्जतुंकीकरण करणे, कोरोना लक्षण असलेल्या नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. आज ग्रामस्थांचे स्वॅब संकलन शिबीर आयोजित करुन १९८ ग्रामस्थांचे नमुने संकलीत करण्यात आले. तसेच भालेर, परिसर व वडवद येथे ट्रॅक्टरद्वारे औषध फवारणी करुन संपूर्ण गावांचे निर्जतुंकीकरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सरपंच जागृती पाटील. ऊपसरपंच गजानन पाटील, ग्राम विकास अधिकारी सुर्यकांत दशपुते, तलाठी अतुलकुमार पवार , पी. पी. बागुल, चंद्रशेखर पाटील, स्वॅब संकलक राकेश पाटील, ए.एन.एम. वर्षा राणेगावीत, ए.एन. एम. अर्चना ओगले, शालीनी पाटील, आशावर्कर मंगला भिल, योगीता पाटील, मनिषा गोसावी, चंद्रकला पाटील. जनार्दन आभणे,नानाभाऊ पाटील यांनी परिश्रम घेतले. हा कार्यक्रम जनेतेचा हिताचा असुन संपुर्ण ग्रामस्थांनी आरोग्य तपासनी करुन स्वॕ देण्याचे अवाहन भालेर ग्राम पंचायत मार्फत केले आहे. कार्यक्रमात नमुने घेतलेल्या नागरिकांना माक्सचे वाटप करण्यात आले.