सुट्या संपल्या; शाळेचे प्रांगण फुलले (व्हिडीओ)

.jpg

 

भुसावळ प्रतिनिधी । उन्हाळयाच्या सूट्टया संपल्या आहेत. आजपासून शाळेचे प्रागंण मुलांनी सजलेले पाहवयास मिळेल. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने शाळेचा परिसर फुलला असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले आहे.

किंबहूना, शहरातील अहिल्यादेवी कन्या विद्यालय व जिजामाता माध्यमिक विद्यालयात शाळेच्या प्रवेश द्वारावर आंब्याच्या पानाची तोरणे बांधण्यात आली होती. शिक्षिकांनी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर रांगोळी काढून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेच्या मुख्याध्यापिका प्राची देसाई यांच्या हस्ते मुलींची पहिली शाळा सुरू करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले. शहरातील मुख्य मार्गावरून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. तचेस विद्यार्थ्यांनी ‘चला, चला, चला शाळेला चला’ अशा गगनभेदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. शाळेचा पहिला दिवस नवीन मित्र-मैत्रिणी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा आनंद निर्माण झाला होता. शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय साहित्य व गुलाब पुष्प देऊन स्वागत केल्याने शाळेच्या परिसरांमध्ये आनंदमय वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांच्या चेहरा आनंदाने फुलला होता. यावेळी पर्यवेक्षिका निर्मला सुराणा, ज्येष्ठ शिक्षक नाना पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content