भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील गोजोरे येथील महिलेचे बंद घर फोडून ६ लाख १३ हजार ६०० रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीच्या दागिन्यांचा ऐवज लांबविणाऱ्या चार संशयित आरोपींना भुसावळ तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून इतर चोरीचा एकूण १० लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत इतर चोरीचे गुन्हे देखील उघडकीला आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत शुक्रवारी १८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील गोजोरे गावात मालतीबाई अभिमान चौधरी (वय-५७) ह्या आपल्या पती व मुलीसह वास्तव्याला आहे. २६ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता घराला कुलूप लावून पुण्याला गेले होते. घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी बंद घर फोडून ६ लाख १३ हजार ६०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लांबविले होते. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तांत्रिक मदत व सीसीटीव्ही फुटेच्या आधारे गुन्ह्याच्या शोध घेणे सुरू केले. तसेच गावात बैठका घेऊन गावाची सुरक्षा घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले व गावात रात्रीची ग्रस्त घेण्यात आली. दरम्यान १२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास दुचाकीवर तीन जण संशयितरित्या फिरत असताना दिसून आलेत. गावकऱ्यांनी तिघांना ताब्यात घेत पोलीसांच्या स्वाधिन केले. पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज मधील आणि ताब्यात घेतलेला तीन आरोपींमधील एकाची ओळख पटली. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. संशयित आरोपी रवी प्रकाश चव्हाण (वय-१८) रा. शबरीनगर, तांबपुरा जळगाव, जुनेद उर्फ मुस्तकीन शहा भिकन शहा (वय-२२) रा. तांबापुरा आणि सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगा अशा तिघांना ताब्यात घेतले.
अटेतील संशयितांवर असे आहेत गुन्हे दाखल
यातील संशयित आरोपी रवी चव्हाण यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात ३ तर रामानंदनगर पोलीस ठाण्यात २ चोरीचे गुन्हे दाखल आहेत तर जुनेद उर्फ मुस्तकीन शहा भिकन शहा याच्यावर देखील जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्यांनी या शहरीतील सोन्याचे दागिन्यांची विल्हेवाट त्यांच्या साथीदार गुरुदयालसिंग मनजितसिंग टाक याने गुजरातमध्ये जाऊन विकले होते. गुरूदयासिंग टाक यांच्यावर देखील चोरीचे गुन्हे दाखल आहे. दरम्यान पोलिसांनी या चौघांकडून रोख रक्कम, सोने चांदीचे दागिने असा एकूण १० लाख ९४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली परीविक्षाधिन पोलीस उपाधीक्षक सतीश कुलकर्णी, भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, संजय तायडे, युनिक शेख, दीपक जाधव, प्रेमचंद सपकाळे, धीरज मंडलिक, सादिक शेख, राजीव काझी, उमाकांत पाटील तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे जगदीश भोई, प्रशांत चव्हाण यांनी कारवाई केली. या चौघांकडून अजून काही चोरीचे गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे.