जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा शिवारातील शेतात एका सहा वर्षीय बालिकवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या संशयित आरोपी सुभाष उमाजी भील सोनवणे वय-३५ रा.वावडदा ता. जळगाव याला बुधवारी २६ जून रोजी जळगाव न्यायालयात हजर केले असता न्या.श्रीमती एस. आर भांगडिया यांनी ५ दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक असे की, जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा शिवारातील केळी शेतात एका सहा वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना मंगळवारी ११ जून रोजी रात्री १० वाजता उघडकीला आले होते. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर संशयित आरोपी सुभाष भील हा फरार झाला होता. त्यानंतर जामनेर पोलीसांनी भुसावळ पोलीसांच्या मदतीने २० जून रोजी रात्री ९.३० वाजता भुसावळ शहरातील तापी नदी काठावरील परिसरातून अटक केली होती. त्यानंतर त्याला जामनेर पोलीसांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर त्यांला २१ जून रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची २६ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज बुधवारी २६ जून रोजी त्यांला पुन्हा जळगाव येथील न्यायालयात हजर केले असता न्यायमुर्ती श्रीमती एस. आर भांगडिया यांनी ५ दिवसांची ३० जून पर्यंत वाढीव पोलीस कोठडी सुनावली. सरकार पक्षा तर्फे सहाय्यक सरकारी वकील निलेश चौधरी यांनी कामकाज पाहिले.