जळगाव-लाईवह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकी समोरून बाजूला होण्याचे सांगितल्याच्या रागातून दुचाकीवरील तरूणावर ब्लेडने वार करून गंभीर दुखापत करणाऱ्या फरार संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भडगाव येथून अटक केली आहे, अशी माहिती पोलीस मुख्यालयातील जनसंपर्क विभागाच्या वतीने सायंकाळी ६ वाजता प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, भडगाव शहरातील पारोळा चौफुली येथे एकनाथ रवींद्र पाटील वय-२३ रा. कोठली ता. भडगाव हा मंगळवारी ५ मार्च रोजी रात्री ८ वाजता दुचाकीने त्याचा मित्र विशाल सोबत आला होता. दुचाकीने जात असतांना दुचाकी समोर रवींद्र संतोष जाधव वय-२६ रा. भडगाव समोर आला. त्याला बाजूला होण्याचे सांगितले. याचा राग आल्याने त्याने थेट एकनाथ पाटील याच्यावर ब्लेडने वार करून दुखापत केली व फरार झाला. याप्रकरणी भडगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत संशयित आरोपी रवींद्र संतोष जाधव याला बुधवारी ६ मार्च रोजी सकाळी १० वाजता भडगाव शहरातून अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी संशयिताला भडगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमारे, विजयसिंह पाटील, लक्ष्मण पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, महेश जाधव, विजय पाटील यांनी केली आहे. अशी माहिती पोलीस मुख्यालयातील जनसंपर्क विभागाच्या वतीने सायंकाळी ६ वाजता प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.