पोलिसांना चकवा देऊन फरार झालेल्या संशयिताला अटक; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत अटक केलेला संशयित आरोपी न्यायालय आवारातून पळून गेल्याची घटना बुधवार १२ जून रोजी दुपारी ३ वाजत घडली होती. दरम्यान हा फरार आरोपी दिवसभर लपून राहिल्यानंतर गुरुवार १३ जून रोजी पहाटे ३ वाजता लपत छपत घरी जात असताना वाटेतच एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून अटक केली. त्याला पुढील कार्यवाहीसाठी शनिपेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

भोलासिंग जगदीशसिंग बावरी (वय ३२, रा.तांबापुरा, जळगाव) या संशयित आरोपीला शनिपेठ पोलिसांनी एका भंगार विक्रेत्याला मारहाण केल्याप्रकरणी अटक केली होती. भोलासिंग हा अट्टल गुन्हेगार आहे. ४ ते ५ दिवसापूर्वी तुरुंगातून सुटून बाहेर आलेला आहे. त्यानंतर त्याने पुन्हा मारहाणीचा प्रकार केल्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान न्यायालयात त्याला हजर केल्यावर न्यायालयीन कोठडी मिळाली होती.

शनीपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी बोरसे व वानखेडे हे त्याला पुढील कार्यवाहीसाठी घेऊन जात असताना न्यायालयाच्या आवारातूनच बुधवारी भोलासिंग बावरी याने पलायन केले होते. याप्रकरणी शनीपेठ पोलीस स्टेशनला लांच्छन लागले होते. दरम्यान गुरुवारी १३ जून रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास दिवसभर लपून बसलेला भोलासिंग बावरी हा लपत छपत सिंधी कॉलनी परिसरातून तांबापुराकडे घरी जात होता. त्यावेळेला गस्तीवर असणाऱ्या पोलिसांची नजर त्याच्यावर पडली.

त्यांनी त्याचा पाठलाग करीत त्याला ताब्यात घेतले. सिंधी कॉलनी येथील भक्त निवास येथे तो लपून बसला असल्याची माहिती मिळाली. दरम्यान पोलिसांनी त्याला पकडून आणल्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशनला पुढील कारवाई केली.

दरम्यान भोलासिंग बावरी याला अटक झाल्यामुळे शनिपेठ पोलीस स्टेशनने सुटकेचा निश्वास टाकला आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनने शर्थीचे प्रयत्न करून भोलासिंग बावरी याला अटक केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे, सिद्धेश्वर डापकर, नरेंद्र मोरे विनोद आस्कर यांचे टीमने भोलासिंग बावरी याला पकडले आहे.

Protected Content