जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चोरीची दुचाकी घेणाऱ्या फारुख हुस्नोउद्दीन शेख (२९, रा. एरंडोल) याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जानेवारी रोजी एरंडोल येथून अटक करत दुचाकी हस्तगत केली.
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना माहिती मिळाली की, एरंडोल येथील फारुक हुस्नोद्दीन शेख याने चोरीची दुचाकी घेतली असून ती त्याच्या घरी आहे. त्यानुसार त्यांनी सपोनि नीलेश राजपूत, पोउनि गणेश वाघमारे, पोहेकॉ सुनील दामोदरे, महेश महाजन, नंदलाल पाटील, संदीप सावळे, पोलिस नाईक भगवान पाटील, राहुल बैसाणे, अशोक पाटील, पोकॉ ईश्वर पाटील यांना कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने रविवारी १४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता एरंडोल येथे जाऊन फारुक याची चौकशी केली व अटक केली. त्यावेळी त्याने ही दुचाकी सराईत गुन्हेगार योगेश शिवाजी दाभाडे (रा. पथराड, ता. भडगाव) याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. दुचाकी घेताना ती चोरीची असल्याचे माहीत असताना त्याने ती घेतल्याचेही सांगितले.
ही दुचाकी जळगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेली होती. संशयित आरोपी शेख याला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.