जळगाव प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील जेडीसीसी बँके जवळील रहिवाश्याच्या घरात घरफोडी होऊन रोकडसह दागिने लंपास झाले होते. दाखल गुन्ह्यात स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने एरंडोल येथील गवंडी काम करणाऱ्या तरुणाला अटक केली असुन त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील उपनिरीक्षक रविंद्र गिरासे, विजय पाटील, नरेंद्र वारुळे, कमलाकर बागुल, भगवान पत्तटील, सचिन महाजन अशांच्या पथकाकडे घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास होता. एरंडोल तालूक्यातील वनकोठे गावातील गवंडी घरफोडीचे गुन्हे करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. गुन्हेशाखेच्या पथकाने अजस हिरालाल मोहिते (वय-१९) याला ताब्यात घेत पेालिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली देत १३ऑक्टोबर रेाजी दिनेश दिलीप सांळुंखे यांच्याकडे घरफोडीचा गुन्हा केल्याचे कबुल केले असून पथकाने त्याला अटक करुन चौकशी सुरु केली आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीस कासोदा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.