तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला अटक

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील मोहित नगरात बेकायदेशीर रित्या हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या संस्थेत आरोपीला भुसावळ शहर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल रविंद्र सोनवणे वय -३६, रा. मोहित नगर भुसावळ असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील मोहित नगरात संशयित आरोपी राहुल सोनवणे हा हातात तलवार घेऊन दहशत मजवित असल्याची गोपनीय माहिती भुसावळ शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी १० जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता कारवाई करत संशयित आरोपी राहुल सोनवणे याला ताब्यात घेतले त्याच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत केली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दीपक शेवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद करीत आहे.

Protected Content