जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव मतदार संघातून शिवसेनेचे नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन हे निवडणूक लढविणार असल्याची माहिती शिवसेनेचे मनपातील विरोधीपक्ष नेते सुनील महाजन यांनी दिली.सूरेशदादा जैन हे निवडणूक लढवतील किंवा नाही याबाबत काही याबाबत जळगावकरांमध्ये शासंकता होती ती आता दूर झाली आहे.
जळगाव विधानसभा निवडणूकीबाबत विषयावर ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी नगरसेवक प्रशांत नाईक उपस्थित होते. गेल्या पावणेपाच वर्षात जळगाव शहराचे वाटोळे झाले आहे. शहराच्या विकासाची ही परिस्थिती पाहता जळगाव मतदारसंघात “व्हिजन” असलेला आमदार असावा त्याची प्रशासनावर व राज्यकर्त्यांवर मजबूत पकड असावी अशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची इच्छा होती. आगामी काळात युतीचीच सत्ता येणार असल्याने सुरेशदादा यांनीच शहराचे प्रतिनिधीत्व करावे अशी शिवसेना पदाधिकाऱ्याची इच्छा असल्याने गेल्या काही महीन्यांपासून शिवसेनेचे पदाधिकारी जैन यांची यासाठी मनधरणी करीत होते. याबाबत शनिवारी जैन व त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा झाली आहे असे महाजन यांनी स्पष्ट केले.
गत काही दिवसांपासून सुरेशदादा जैन हे विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू होती. याबाबत त्यांनी काहीही भाष्य केलेले नाही. सुनील महाजन हे जैन यांचे कट्टर समर्थक मानले जात असल्यामुळे त्यांनी दिलेल्या माहितीला महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, ही घोषणा खरी ठरल्यास जळगावाती राजकीय मुकाबला अतिशय रंगतदार होण्याची शक्यता आहे.