जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा फुटबॉल असोसिएशनची पुढील चार वर्षासाठी नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली असून जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे पूर्वाश्रमीचेच अध्यक्ष सुरेशदादा जैन यांची पुनश्च अध्यक्षपदी निवड झाली आहे.
जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी प्रा. डॉ.अस्मिता पाटील व जळगावचे उद्योगपती पिंच बॉटलींगचे जफर शेख, कार्याध्यक्षपदी भुसावळचे बी, झेड ,कॉलेजचे माजी प्राचार्य मोहम्मद आबिद, सचिवपदी जळगावचे फारुक शेख , सह सचिवपदी डॉ. अण्णासाहेब जी, डी, बेंडाळे महाविद्यालयाच्या प्रा. डॉ.अनिता कोल्हे, दुसरे सहसचिव म्हणून फुटबॉलचे प्रशिक्षक भुसावळचे अब्दुल मोहसीन, खजिनदार म्हणून जळगावचे शेखर देशमुख, कार्यकारी संचालक म्हणून पोलीस दलातील राष्ट्रीय फुटबॉलपटू मनोज सुरवाडे, भुसावळचे नगरसेवक इम्तियाज शेख व जळगावचे ताहेर इब्राहिम यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे.