Home Cities जळगाव खान्देश कन्या महिला विकास मंडळाच्या कार्यक्रमात सुरेश वाघ यांना विशेष सन्मान 

खान्देश कन्या महिला विकास मंडळाच्या कार्यक्रमात सुरेश वाघ यांना विशेष सन्मान 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जळगावात आयोजित खान्देश कन्या महिला विकास मंडळाच्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रीय हिंदू संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश वाघ यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात महिला सक्षमीकरणासोबतच सामाजिक एकजुटीचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती मंगलाताई बारी होत्या. त्यांनी आपल्या मनोगतात महिला दिनाचे औचित्य साधत जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय हिंदू संघटनेच्या प्रचार आणि प्रसाराचे कार्य प्रभावीपणे सुरू असल्याचे सांगितले. सुरेश वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

या कार्यक्रमात सुरेश वाघ यांना माननीय आमदार चंद्रकांत दादा सोनवणे आणि माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते विशेष सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. हिंदू एकजुटीचे कार्य, तसेच अन्याय आणि अत्याचाराविरोधात सातत्याने उभे राहण्याच्या त्यांच्या भूमिकेची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमास उपजिल्हाध्यक्ष नागराज महाजन, कार्यकारिणी उपाध्यक्ष योगेश बाविस्कर, महामंत्री राजेश बंसल, सचिव राजेंद्र बारी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. उपस्थितांनी कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेत संघटनात्मक कार्याबाबत एकात्मतेचा संदेश दिला.

सन्मान स्वीकारताना सुरेश वाघ यांनी हा गौरव केवळ वैयक्तिक नसून सर्व कार्यकर्त्यांचा असल्याचे सांगितले. संघटनेचे कार्य प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. समाजातील अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.


Protected Content

Play sound