नवी दिल्ली वृत्तसंस्था । आगामी टी-२० विश्वकप स्पर्धा 2020 मध्ये आयोजित करण्यात आली आहे. यासाठी गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्ध मालिकेतील शेवटचा सामना खेळणारा सुरेश रैना हा सध्या टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भारतीय संघातील क्रमांक ४ हे स्थान दीर्घ काळापासून चर्चेचा विषय बनलेला आहे. अम्बटी रायुडूला चौथ्या स्थानी खेळवल्यानंतर निवडकर्त्यांनी विश्वचषक स्पर्धेसाठी विजय शंकरची निवड केली. शंकर जायबंदी झाल्यानंतर ऋषभ पंतला या स्थानी खेळण्याची संधी देण्यात येत आहे. या यापूर्वी चौथ्या स्थानावर फलंदाजी केली असून चांगली कामगिरी करून दाखवल्याचे रैनाने म्हटले आहे. क्रिकेट हा एक मानसिक खेळ आहे. ऋषभला समर्थनाची आवश्यकता असून त्यामुळे तो आपला आक्रमक खेळ खेळू शकतो.