जळगाव प्रतिनिधी । घरकुल घोटाळ्यातील सर्व आरोपींना न्यायालयाने महिनाभरापूर्वी शिक्षा सुनावली. यात सुरेश जैन यांचा देखील समावेश असल्याने महापालिकेच्या सभागृहात सुरेश जैन यांचा असलेले तैलचित्र (फोटो) काढण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ता दिपक कुमार गुप्ता यांनी केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाच्या बांधकाम विभागाने हा फोटो काढला आहे.
महापालिकेच्या सभागृहात डाव्या बाजूला सरदार वल्लभाई पटेल यांचातर तर उजव्या बाजूला सुरेश जैन यांचा मोठा फोटो लावण्यात आलेला होता. घरकुल घोटाळ्यात सुरेश जैन आरोपी असून त्यांना न्यायालयाने शिक्षा दिली असल्याने सभागृहात आरोपीचा फोटो लावणे योग्य नसून तो फोटो काढण्यात यावा अशी मागणीचे निवेदन दहा दिवसापूर्वी आरटीआय कार्यकता गुप्ता यांनी आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांना निवेदनाद्वारे केली होती. तसेच फोटो न काढल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. फोटो लावण्याबाबत कोणता ठराव झालेला नसल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने हा फोटो काढला आहे.