सुरेखा सोनवणे यांचा सन्मान: लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गौरव

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील माहेर असलेल्या आणि मुंबईत संरक्षण अधिकारी म्हणून काम पहाणाऱ्या सुरेखा निंबाजी सोनवणे यांना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत आणि आयुक्त कैलास पगारे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सुरेखा सोनवणे यांनी लाभार्थी आणि सर्वसामान्यांची प्रामाणिक सेवा केल्याबद्दल त्यांना विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले.

सुरेखा सोनवणे यांच्या या कार्यामुळे डांभुर्णी तालुका, यावल या गावात आणि परिसरात तसेच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र चव्हाण परिवार (दोंडाईचा), स्वयंदीप परिवार जळगाव आणि मराठा सेवा संघ यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

सुरेखा सोनवणे यांनी महिला आणि बाल विकास विभागामध्ये संरक्षण अधिकारी म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत.
त्यांनी लाभार्थी आणि सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी नेहमीच तत्परता दाखवली आहे.

Protected Content