नवी दिल्ली वृत्तसंस्था । अयोध्येतील बाबरी मशीद जमीन प्रकरणी सर्वोच्च न्यायालय उद्या सकाळी १०.३० वाजता निकाल देणार असून याआधी देशभर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अयोध्येतील बाबरी मशीद जमीन प्रकरणी सुप्रीम कोर्ट शनिवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता निकाल देणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यावर न्यायालयात सुनावणी सुरू होती. दरम्यान, उद्या निकाल येणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर देशभर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोशल मीडियात अफवा पसरवू नये असा इशारा पोलीस प्रशासनाने आधीच दिलेला आहे. यासोबत सार्वजनीक स्थळांवर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.