नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | आम आदमी पक्षाला सुप्रीम कोर्टाने झटका दिला. आम आदमी पक्षाचे दिल्लीतील कार्यालय रिकामे करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. परंतू कोर्टाकडून पक्षाला काहीसा दिलासाही मिळाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमुळे कार्यालय रिकामे करण्यासाठी 15 जूनपर्यंत मुदत दिली आहे. हे कार्यालय कोर्टासाठी आरक्षित जागेवर असल्याची तक्रार करण्यात आली होती.
आम आदमी पक्षाचे कार्यालय दिल्लीतील राऊज अव्हेन्यू कोर्टासाठी आरक्षित जागेवर उभारण्यात आले आहे. याबाबत दिल्ली हायकोर्टानेही तीव्र नाराजी व्यक्त करत जागा रिकामी करण्याचे आदेश दिले होते. याविरोधात आपकडून सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली होती. पण तिथेही आपला धक्का बसला आहे. नवीन कार्यालयासाठी आपने सरकारकडे अर्ज करावा, आप नवीन कार्यालयाच्या जागेसाठी सरकारकडे अर्ज करू शकते. या अर्जावर संबंधित विभागाने चार आठवड्यात निर्णय घ्यावा. सध्याचे कार्यालय आधापीसून कोर्टासाठी आरक्षित जागेवर आहे. या जमिनीवर हायकोर्टातील कर्मचाऱ्यांसाठी रहिवासी इमारत बांधली जाणार आहे. तिथे पक्षाच्या कार्यालयाला परवानगी दिली जाऊ शकत नाही