हार्दिक पटेलला सुप्रीम धक्का:निवडणुकीतून घ्यावी लागणार माघार

hardik patel news 1553855400

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेला काँग्रेस नेता हार्दिक पटेल याला सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. सुप्रीम कोर्टाने त्याच्या याचिका अर्जावर सुनावणी करण्यास नकार दिला आहे.

 

२०१५ मध्ये मेहसाणात दंगल भडकवल्याप्रकरणी वीसनगर कोर्टाने हार्दिक पटेलला दोषी ठरविले होते आणि दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. या निर्णयाविरोधात हार्दिकने गुजरात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, २९ मार्चला झालेल्या सुनावणीत गुजरात हायकोर्टाने ही याचिका फेटाळली होती. त्यानंतर त्याने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

आज सुप्रीम कोर्टाने हार्दिक पटेलच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे हार्दिकला मोठा धक्का बसला असून त्याला आगामी लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही. कारण, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख सुद्धा ४ एप्रिलच आहे.

गुजरातमध्ये आरक्षणाच्या मुद्यावरून केलेल्या आंदोलनात हार्दिक पटेलविरुद्ध विविध १७ गंभीर गुन्ह्यांची नोंद पोलिसांनी केली आहे. अशा प्रकारचे गंभीर गुन्हे असले तर निवडणूक लढवायला परवानगी दिली जात नाही. त्यामुळे या प्रकरणांना स्थगिती द्यावी, अशी मागणी हार्दिकने कोर्टात केली होती.

Add Comment

Protected Content