मुंबई प्रतिनिधी । कामगारांनी ८ जानेवारी रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार आहे.
देशातील विविध कामगार संघटनांनी ८ जानेवारी रोजी संपाची हाक दिली आहे. यात सहभागी होण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच जाहीर केला होता. यात आता शिवसेनादेखील सहभागी होणार आहे. शिवसेनेची भारतीय कामगार सेनादेखील या संपत सहभागी होणार आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकारत परिषदेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी संजय राऊत म्हणाले कि, देशातील कामगाच्या न्याय हक्कासाठी आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत. देशात बेरोजगारी वाढत असून रोजगाराचे बिकट प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. हा संप सरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधात पुकारण्यात येणार आहे. या देशव्यापी संपला काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी, शेतकरी कामगार पक्ष आदी पक्षांचा पाठिंबा आहे.