Home क्राईम पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांच्या हस्ते पारोळा पोलिसांचा गौरव

पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांच्या हस्ते पारोळा पोलिसांचा गौरव

0
92

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सबगव्हाण टोलनाका गुन्हा प्रकरणाचा कमी कालावधीत उलगडा व आरोपींना तात्काळ अटक करणार्‍या पारोळा पोलीस निरीक्षकांसह पथकास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

पारोळा पोलीस स्टेशन अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग सहा वरील सबगव्हाण टोलनाका हा सुरू होण्यापूर्वीच ११ मार्चच्या मध्यरात्री चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी तोडफोड जाळपोळ करून सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान केले होते. या प्रकरणी फिर्यादीनुसार पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल होऊन आरोपींनी पोलिसांसमोर मोठे आव्हान ठाकले होते. त्या अनुषंगाने पारोळा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, हवालदार सुनील हटकर,दीपक अहिरे,आशिष गायकवाड यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध सुरू केला होता.

दरम्यान, दि. १७ मार्च रोजी आझाद नगर पोलीस ठाणे (धुळे) हद्दीतील संशयित आरोपी प्रितेश उर्फ सोनू गुजर यास अटक करण्यास यश आले व त्याचाकडून गुन्ह्यातील इतर चार साथीदार निष्पन्न झाले. तसेच २८ मार्च रोजी मध्यरात्री तीन आरोपी हे सोनगीर (ता.जि.धुळे) येथे येणार असल्याची गोपनीय माहिती ही मिळाली. त्यावरून पारोळा पोलिस निरीक्षक सुनिल पवार,सुनिल हटकर,दीपक अहिरे,आशिष गायकवाड यांनी सापळा रचून आकाश गुजर, अजय पवार,तुषार बागल या तिघांचा मुसक्या आवळल्या. मात्र गुन्ह्यातील पाचवा आरोपी व गुन्ह्यात वापरलेले वाहन देखील पोलिसांना मिळून येत नसल्याने शोध सुरू होता. दरम्यान पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांना गुन्ह्यातील वाहन हे धुळ्यातील एका इसमाचे असून त्याने ते सुरत येथे लावून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने तपास पथकाने तात्काळ सूरत येथे जाऊन वाहन ही जप्त केले.

या कामगिरीची दखल घेऊन पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पारोळा पोलिसांना प्रशस्तपत्रक देऊन गौरविले. याप्रसंगी चाळीसगाव अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल नंदवाळकर यांच्या उपस्थितीत पारोळा पोलिस निरीक्षक सुनिल पवार, अमळनेर उपविभागातील एरंडोल पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, पारोळा येथील हवालदार सुनिल हटकर,बापू पारधी,दीपक अहिरे, आशिष गायकवाड,मारवाड येथील उज्वल पाटील या पथकाला प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.


Protected Content

Play sound