सुनीता विल्यम्स-बुच विल्मोर अंतराळातून मतदान करणार

न्यूयार्क-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर गेल्या 3 महिन्यांपेक्षा अधिक काळापासून इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वर अडकले आहेत. स्टारलायनर या स्पेसक्राफ्टमधून ते अंतराळात गेले होते, मात्र आता या दोघांशिवाय ते पृथ्वीवर लँड झाले. सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर हे दोघे मात्र अजूनही अंतराळातच असून फेब्रुवारी 2025पर्यंत ते पृथ्वीवर परततील असे नासाने म्हटले आहे. मात्र, अमेरिकेत 5 नोव्हेंबरला राष्ट्रपती पदाच्या निवडणुका होत आहेत. त्यात सहभाग नोंदवणार असल्याचं सुनीता विल्यम्स यांनी म्हटले आहे.

सुनीता विलियम्स यांच्यासोबत बुच विल्मोर हेही अंतराळातच अडकले आहेत. ‘ आम्हाला स्टारलायनर आमच्याशिवाय भारतात जाताना पाहायचं नव्हतं, मात्र तेच घडणार होतं. ते आमच्याशिवायच (पृथ्वीवर) परत जाणार होतं’ असं विल्मोर म्हणाले. ‘आम्ही पुढच्या संधीची वाट पाहत आहोत’ असं सुनीता विलियम्स यांनी नमूद केलं. त्याशिवाय, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वर असणे हे त्यांच्यासाठी आनंदाचे ठिकाण असल्याचे सुनीता विलियम्स यांनी म्हटले आहे.

स्टारलाइनर स्पेसक्राफ्टमधील तांत्रिक बिघाडामुळे, सुनीताविलियम्स आणि बुच विल्मोर या दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्याचे मिशन पुढे ढकलले गेले आहे. त्यानंतर नासाने 24 ऑगस्ट रोजी घोषित केले की सुनीता विल्यम्स आणि विल्मोर फेब्रुवारी 2025 मध्ये, स्पेसएक्सच्या के ड्रॅगन अंतराळयानाद्वारे 8 महिन्यांनंतर परत येतील. सध्या स्टारलायनर हे स्पेसक्राफ्ट दोन्ही अतंरावीरांविनाच पृथ्वीवर लँड झाले आहे.

Protected Content