Home आरोग्य ‘संडे क्लिनीक’चे डॉ. केतकी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

‘संडे क्लिनीक’चे डॉ. केतकी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन


 जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अत्यल्प दरात दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या ‘संडे क्लिनीक’चे उद्घाटन गोदावरी हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांच्या हस्ते झाले. एस.डी. फाऊंडेशन आणि छत्रछाया फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेला हा उपक्रम गरजूंना साप्ताहिक स्वरूपात वैद्यकीय सेवा देणार आहे.

डॉ. केतकी पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले की, “रविवारी गरजूंना आरोग्य सुविधा देण्याची संकल्पना फारच स्तुत्य आहे. एस.डी. फाऊंडेशनने ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली हे विशेष कौतुकास्पद आहे. गोदावरी हॉस्पिटलकडून पुढील उपचारांसाठी आणि संपूर्ण आरोग्य सेवेसाठी संडे क्लिनिकला आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल,” असे आश्वासनही त्यांनी दिले.

या साप्ताहिक दवाखान्यात ज्येष्ठ होमिओपॅथी तज्ञ डॉ. विवेक जोशी रुग्ण तपासणी आणि औषधोपचार करतील. दवाखाना दर रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार असून अत्यल्प दरात औषधोपचार मिळणार आहेत. त्यामुळे गरजू नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एस.डी. फाऊंडेशन आणि छत्रछाया फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

या उद्घाटनप्रसंगी वैद्य डॉ. आनंद दशपुत्रे, एस.डी. फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. सुधाकर दुसाने, सचिव सुहास दुसाने, भाग्यश्री दुसाने, बी.आर. पाटील, क्रांती दशपुत्रे, दुर्गाप्रसाद पुंडे, अपर्णा जोशी, प्रविण पारसवाणी, जतिन इंगळे यांची उपस्थिती लाभली. संडे क्लिनिकच्या माध्यमातून गरजूंना दर रविवारी सहज आणि स्वस्त दरात उपचार मिळणार असून, ही सेवा समाजातील आरोग्यदृष्ट्या दुर्लक्षित घटकांसाठी नक्कीच वरदान ठरणार आहे.


Protected Content

Play sound