अमळनेर (प्रतिनिधी) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व अमळनेर तालुका क्रीडा संयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘उन्हाळी प्रशिक्षण शिबिर 2019’ नुकतेच घेण्यात आले होते. त्यात तालुक्यातील तीनशे खेळाडूंना खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या शिबिराची सांगता झाली असून शिबिराच्या शेवटच्या दोन दिवस विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. तर शिबिरातील प्रशिक्षणार्थींना टी-शर्ट व सहभाग प्रमाणपत्र ,मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते शहरातील शिवाजी महाराज नाटय सभागृहात नुकताच सत्कार करण्यात आला.
बक्षीस वितरण प्रसंगी तहसीलदार ज्योती देवरे ,पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, बिल्डर प्रशांत निकम होते कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रशिक्षण शिबिरात फुटबॉल, हॉलीबॉल, रिंग टेनिस, योगा, क्रिकेट, खो-खो, कबड्डी, दोरीवरील उड्या, आट्यापाट्या मैदानी स्पर्धा, कराटे, बुद्धिबळ अशा विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थी मैदानाकडे वाढण्यासाठी विविध उपक्रम घेऊन त्यांच्यात खेळाची आवड निर्माण होण्यासाठी यावेळी प्रयत्न करण्यात आले.
बक्षीस वितरण प्रसंगी तहसीलदार ज्योती देवरे म्हणाल्या की, अमळनेर क्रीडा स्पर्धा संघटनेचे काम कौतुकास्पद आहे. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी सुट्टीत गावी जातात. परंतु अमळनेरच्या क्रीडा समितीतील शिक्षकांनी उन्हाळी सुट्टीवर पाणी सोडून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व स्पर्धेला वाव देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. त्यांच्या हातून असेच चांगले विद्यार्थी घडत राहो अशा शुभेच्छा दिल्या. बक्षीस वितरण प्रसंगी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर म्हणाले की, अंमळनेर किडा संघटनेचेच्या वतीने उन्हाळी क्रिंडा प्रशिक्षणात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसं मिळवली, ही अभिनंदनीय आहे. खेळातील स्पर्धेमुळेच तुमचे भावी जीवन उज्वल आहे, असे सांगितले. स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर खेळाशिवाय पर्याय नाही, असे मार्गदर्शन देखील केले. तसेच क्रीडा समितीचे अध्यक्ष एस.पी वाघ व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.
उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात क्रीडा समितीचे अध्यक्ष एस.पी. वाघ, डी.डी राजपूत, प्रा.ए.के.अग्रवाल,एन डी विसपुते ,एस आर बोरसे, सॅम शिंगाणे, एस वाय करंदीकर, विनोद पाटील, पंकज पाटील, महेश माळी ,बापूराव सांगोरे ,हर्षद शेख, धर्मा मद्रासी यांनी प्रशिक्षणात मार्गदर्शन व मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले.