जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एकलव्य क्रीडा संकुल येथे १५ एप्रिल ते १५ मे २०२३ दरम्यान घेण्यात आलेल्या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा समारोप दिनांक १८ मे २०२३ रोजी सायंकाळी ०६:०० वाजता मू. जे. महाविद्यालयाच्या जुन्या कॉन्फरन्स हॉल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून के.सी.ई. सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, पालक प्रतिनिधी हेमंत भट, सोनल व्यास, मू. जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक व एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर व एकलव्य स्केटिंग आकॅडेमीचे मुख्य प्रशिक्षक तसेच शिबीर प्रमुख प्रा. रणजित पाटील, प्रा. निलेश जोशी व प्रा. प्रविण कोल्हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. लक्ष्मी परदेशी व कु. हर्षिता पाटील यांनी केले तसेच शिबिराचा अहवाल डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर सर यांनी वाचून दाखवला व कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले.
सदर क्रीडा प्रशिक्षण शिबिरात एकूण ११० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. याप्रसंगी के.सी.ई. सोसायटीचे मा. प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर यांनी खेळाडू व पालकांना जीवनातील खेळाचे महत्व यासंबंधी मार्गदर्शन केले तर डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी एकलव्य क्रीडा संकुलाची भविष्यातील वाटचाल यासंबंधी माहिती दिली.
या वेळी सामान्य शिबिरातील उत्कृष्ट खेळाडूंचा गौरव के.सी.ई. सोसायटीचे मा. प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, पालक प्रतिनिधी हेमंत भट, सोनल व्यास, मू. जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक व एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर व एकलव्य स्केटिंग आकॅडेमीचे मुख्य प्रशिक्षक तसेच शिबीर प्रमुख प्रा. रणजित पाटील, प्रा. निलेश जोशी व प्रा. प्रविण कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. वेदश्री देशमुख, श्रीरंग व्यास, प्राप्ती देशमुख व अश्विन गाडे शिबिरातील उत्कृष्ट खेळाडू ठरले. बक्षीस वितरण समारंभानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी ग्रुप डान्स, वैयक्तिक डान्स सदर केले. या शिबिरात खेळनिहाय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाप्रसंगी कृष्णा सागर झांबरे व कु. अमय सोनवणे या विद्यार्थ्यांनी शिबिरातील त्यांचे अनुभव सांगत मनोगत व्यक्त केले. याच बरोबर पालक प्रतिनिधी हेमंत भट, सोनल व्यास या पालकांनीसुद्धा याप्रसंगी त्यांचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता एकलव्य क्रीडा संकुलाच्या कर्मचारी वृंदाने परिश्रम घेतले. सदर कार्यक्रम डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.