यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर आणि यावल या केळी पट्टयात सततच्या ढगाळ हवामानामुळे सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. त्यामुळे या परिसरात केळी पिकावर सीएमव्ही या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील रावेर व यावल तालुक्यातील तसेच परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी या सिएमव्ही रोगाच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील केळी रोपे उपटून नष्ट केल्याचे दिसून येते. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या माध्यमातून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावेत तसेच सीएमव्ही रोगाचा समावेश केळी पिक विम्यात करण्यात यावा अशी मागणी अमोल जावळे यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांना केली आहे.