यावल प्रतिनिधी । येथील शहरातील धनगरवाडा परिसरात राहणार्या एका महिलेने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
यावल शहरातील धनगरवाडा परिसरात राहणार्या सरलाबाई वासुदेव चौधरी (वय ४५ वर्ष) या महिलेने आज दिनांक २ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील स्वंयपाक खोलीतील छताच्या लोखंडी कडीला दोरी बांधुन गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. शेतमजुरी करून उदरर्निवाह करणार्या महिलेने आत्महत्या का केली हे मात्र समजु शकले नाही
या संदर्भात संतोष शालीग्राम जावळे ( रा. सुंदर नगरी यावल) यांनी खबर दिल्याने यावल पोलीसात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मयत सरलाबाई चौधरी यांच्या मृतदेहाचे यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला यांनी शवविच्छेदन केले. पुढील तपास पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नेताजी पंडीत वंजारी हे करीत आहे.