एरंडोल प्रतिनिधी । येथे गांधीपुरा भागात रत्नाबाई तुळशीराम साळी (वय ४८ ) या महिलेने तिच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
एरंडोल येथील तुळशीराम राजाराम साळी हे सीमा सुरक्षा दलात नागालँड येथे फौजी म्हणुन सेवेत आहेत.त्यांचे कुटुंब येथील गांधीपुरा भागात यशोदीप चौकात वास्तव्यास आहे. साळी हे दोन महिन्यांची राजा घेऊन घरी आले होते. शुक्रवारी ते बाहेर गेले असतांना त्यांची पत्नी रत्नाबाई साळी यांनी घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल भिमराव मोरे,सुनिल लोहार,अकिल मुजावर,संदीप सातपुते हे करीत आहेत.